"यशवंत वाटचाल:देवराष्ट्र, महाराष्ट्र ते भरतराष्ट्र"
डॉ. निलेश पवार,
न्यू कॉलेज, कोल्हापूर.
न्यू कॉलेज, कोल्हापूर.
सातारा जिल्हा परिषदेच्या पिंपरी ता. कोरेगाव येथील प्राथमिक शाळेत शिक्षण घेत असताना यशवंतराव चव्हाण यांच्यावरील वक्तृत्व स्पर्धेत भाग घेण्याची संधी तत्कालीन शिक्षकांच्यामूळ लाभली, त्यावेळी संपूर्ण भाषनाचा मसुदा शिक्षकानी तयार करून दिलेला होता,मी फक्त समोर जाऊन बटन दाबले की टेप जसा चालू होतो तसं पाठ केलेलं संपूर्ण भाषण एकही शब्द न वगळता बोलायचो, घरच्यांना याच आप्रूप वाटायचं, घरात कोण पाहुणे आले किंवा पाहुण्यांच्या घरी यात्रेला जेवायला गेलो की वडील टेप चालू केल्यासारखे मला भाषण करायला सांगायचे.
आमच्या घरात माझ्या आजोबांच्या फोटो शेजारी चव्हाण साहेबांचा फोटो होता, त्यामुळं लहान असताना मला ते आमच्या घरातलं कोणतरी आहे असं वाटायचं, नंतर घरातलं राजकीय वातावरण असेल किंवा राजकारणाची ओढ यामुळं चव्हाण साहेबांच्या विषयी वाचन वाढलं आणि साहेब समजत गेले.

"धन्य मराठी माय माउली धन्य मराठी देश, उद्योगाची कमान चढते भिडे इथे आकाश, होय कोयना नव्या युगाची समृद्धीची आशा, नांगरली ती माळावरती सौभाग्याची भाषा" या पंक्तींनी मी भाषणाला सुरुवात करायचो, या शब्दांचा मतितार्थ मला नंतर समजला, चव्हाण साहेबांच्या दुरदृष्टीतून साकारलेल्या कोयना प्रकल्पामूळ महाराष्ट्र किती सुजलम सुफलाम झाला आहे हे समजले.
चव्हाण साहेबांच बालपण कराड येथील कृष्णाकाठच्या रम्य परिसरात गेल, कृष्णाकाठीच असलेल्या टिळक हायस्कुल मध्ये त्यांच माध्यमिक शिक्षण पूर्ण झालं. टिळक हायस्कुल मध्ये असतानाच गांधी विचारांना भारावून चलेजाव आंदोलनात भाग घेण्याची प्रेरणा त्यांना मिळाली, एकदा वर्गात शिक्षकानी मुलांना विचारले मुलांनो पुढे तुम्ही कोण होणार त्यावेळी कोणी सांगितलं टिळक होणार तर कोणी म्हणाले गांधी होणार पण यशवंतरावांनी ठामपणे सांगितलं मी यशवंतराव चव्हाणच होणार.
घरची गरीब परिस्थिती आणि वडिलांचा आकस्मिक मृत्यू यामुळं आई विठाबाई यांनी काबाडकष्ट करून यशवंतरावांना शिकवलं याची जाणीव,
स्वातंत्र चळवळीतील सहभाग, प्रागतिक विचारसरणीची जोपासना, समाजवादी दृष्टिकोन आणि सर्वाना सोबत घेऊन जाण्याची सचोटी यामुळे राजकारणात प्रवेश केल्यानंतर अल्पावधीतच मुंबई प्रांताच्या मुख्यमंत्री पदापर्यंत त्यांना मजल मारता आली.
1956 ला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारल्या नंतर बौद्ध धर्मात गेलेल्या दलिताना आरक्षणाचे फायदे का द्यायचे अश्या स्वरूपाचा ठराव मुंबई सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही गुजराती तसेच भांडवलशाही विचारांच्या मंत्र्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी चव्हाण साहेबांनी त्यांना एवढंच सांगितलं की,' धर्म बदलला म्हणून एका रात्रीत त्या माणसाचा सामाजिक किंवा आर्थिक स्तर बदलत नाही' त्यांच्या या ठाम भूमिकेमुळे त्यासाठी वेगळा कायदा करून त्यांचे हक्क अबाधित राखले.

राजकीय नेतृत्व म्हंटले की काही वेळा त्यांच्या नेतृत्वाचा असा कस लागतो आणि त्याच्यातून ते कसे बाहेर पडतात याच्यावर त्यांचे राजकीय भवितव्य अवलंबून असते, संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात असच काहीसे चव्हाण साहेबांच्या बाबतीत झाले, सत्ताधारी पक्षाचे नेतृत्व करत असल्याने स्वाभाविकपणे सयुंक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील आचार्य अत्रे, एस म जोशीं सारख्या मुलुख मैदानी तोफांचा सामना त्यांना करावा लागला. या कठीण प्रसंगाला यशस्वी तोंड देत संयुक्त महाराष्ट्राचा मंगलकलश दिल्लीवरून आणण्याचे भाग्य त्यांना लाभले.
1960 ला महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आणि मुख्यमंत्र्याची माळ साहेबांच्या गळ्यात पडली, त्यावेळी नवाकाळ च्या खाडीलकरांनी चव्हाण साहेबांना विचारले हे राज्य मराठीचें असणार का मराठ्यांचे? त्यावर साहेबांनी त्यांना सांगितले नक्कीच मराठी लोकांचे असणार आणि याचा प्रत्यय 1962 ला ज्यावेळी नवीन मुख्यमंत्री नेमण्याची वेळ आली त्यावेळी आला, स्वजातीय बाळासाहेब देसाई सारखा मुख्यमंत्री पदासाठी तगडा उमेदवार असताना सुद्धा चव्हाण साहेबांनी मुख्यमंत्री पदाची माळ बंजारा समाजातील वसंतराव नाईक यांच्या गळ्यात घातली आणि उक्ती आणि कृतीतील फरक दाखवून दिला.
आचार्य अत्रेंनी जाहीर भाषणात यशवंतरावांना अपत्य नाही यावरून केलेल्या टीकेला पत्नी वेणूताई सह अत्रेंच्या घरी जाऊन नक्की काय वैद्यकीय समस्या आहे हे त्यांना सांगितले यावरून साहेबांची विनम्रता दिसून येते.
पहिले मुख्यमंत्री असताना चव्हाण साहेबांनी आधुनिक महाराष्ट्राचा पाया रचला, शेतकरी जगला तर राज्य जगेल हे माहीत असल्याने त्यांनी शेतकऱ्याच्या उन्नतीसाठी विशेष प्रयत्न केले, साहेब नेहमी म्हणायचे, शेती म्हणजे 10 तोंडाची वाघीण असते, एखाद्या पिकाच्या उत्पन्नाचे पैसे हातात येणार असतील तर त्या येणाऱ्या पैशासाठी 10 तोंडे आ वासून अगोदरच उभी असतात. याच्यावर कायमचा उपाय म्हणून सहकाराच्या माध्यमातून दुसरे शेतीपूरक व्यवसाय उभे करण्याचे काम केले आणि त्याच्यातूनच सहकाराचे सुद्धा विकेंद्रीकरण झालेले बघायला मिळते, सत्ता हि सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचली पाहिजे किंवा त्याच्या मध्ये जास्तीत जास्त लोकांचा सहभाग असला पाहिजे या विचारातून त्रिस्तरीय स्थानिक स्वराज्य संस्था अस्तित्वात आणल्या आणि सत्तेचे विकेंद्रीकरण केले.

साहेबांनी नेहमीच राजकारणातील विरोधी पक्षातील पण प्रागतिक विचाधारेचे असलेले उत्तर महाराष्ट्रातील अण्णासाहेब शिंदे, मराठवाड्यातील उद्धवराव पाटील पश्चिम महाराष्ट्रातले यशवंतराव मोहिते सारख्या अनेकांना मुख्य काँग्रेस सारख्या मुख्य प्रवाहात सामील करून बेरजेचे राजकारण केले.
1962 ला ज्यावेळी चीन ने भारतावर आक्रमण केले त्यावेळी नेहरूंनी साहेबांना दिल्लीला संरक्षणमंत्री म्हणून पाचारण केले, सर्वसामान्य जनतेला जणू सह्याद्री हिमालयाच्या संरक्षणासाठी गेल्या सारखे वाटले, उत्तुंग अमुची उत्तर सीमा इंच इंच लढवू म्हणत चव्हाण साहेब दिल्लीला गेले त्या प्रसंगावरील काही पंक्ती ("हिमालयावर येता घाला, सह्याद्री हा धावून गेला, मराठमोळ्या पराक्रमाने दिला दिलासा इतिहासाला या मातीच्या कणाकणातून तुझ्या स्फुर्तीची फुलतील सुमने, जोवर भाषा असे मराठी " यशवंतांची" घुमतील कवने") कायम आठवणीत राहतात.
दिल्लीमध्ये साहेबांची एक वेगळी ओळख निर्माण होऊ लागली, 1965 ला भारत पाकिस्तान युद्धात एकाक्षणी आर्मी ला वायुसेनेची अर्जंट मदत लागणार आहे म्हंटल्या वर आपल्या स्तरावर 5 मिनिटात वायुसेनेला पाकिस्तानवर आक्रमन करायला परवानगी दिली आणि पाकिस्तान चा दारुण पराभव झाला, पण याचा साहेबांनी राजकारणासाठी कधीही वापर केला नाही.

साहेब राजकारणात सक्रिय असले तरी मराठी साहित्याची त्यांना अतोनात ओढ होती, अभिव्यक्तिस्वातंत्राचा त्यांनी कायम पुरस्कार केला याचे उदाहरण म्हणजे आणीबाणीच्या काळातील कराड येथील साहित्य सम्मेलन, एवढं मोठं राजकीय व्यक्तिमत्व असताना सुद्धा साहेब प्रेक्षकांच्या पहिल्या रांगेत बसले, समोर सरकारविरोधी ठराव मांडला जात असताना सुद्धा विनम्रतेने पाहत बसले.
केंद्र सरकारमध्ये सुरवातीच्या संरक्षण मंत्री पासून ते अर्थ, गृह, वाणिज्य, परराष्ट, उपपंतप्रधान, विरोधी पक्षनेते अशी केंद्रातील सर्व महत्वाची मंत्रीपदे भूषवण्याचा मान महाराष्ट्रातील फक्त एकट्याच्या वाट्याला आला, पंतप्रधान पदाची गुणवत्ता असली तरी त्या पदाने कायम हुलकावणी दिली.
कोणी तरी म्हंटले आहेच" अशीच अमुची एकी असती वदले छत्रपती, दिल्ली हि झुकली असती पाहून कराड बारामती" दिल्लीकर कायम कराड बारामती ला येऊन इथली समृद्धी पाहून जातात, पण कराड अन बारामतीला अजून दिल्ली काबीज करता आली नाही. इतिहासात कराड उत्तर विधानसभा मतदार संघातील कण्हेखेड गावचे शिंदे ( ग्वाल्हेर चे शिंदे) यांनी दिल्लीला धडक मारली पण दिल्ली काबीज करून भारतावर राज्य करता आले नाही, नंतर सर्वगुण संपन्न असताना सुद्धा कराडच्या चव्हाण साहेबांना हि ते शक्य झाले नाही, आणि आत्ता बारामतीचे पवार साहेब पण प्रयत्न करत आहेत पण अजूनपर्यंत तरी ते शक्य झाले नाही.
गेल्या आठवड्यात चव्हाण साहेबांच्या नावाने असलेला पुरस्कार, 2008 च्या जागतिक मंदीचे भाकीत करणारे जागतिक कीर्तीचे अर्थतज्ज्ञ, रिजर्व बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांना जाहीर झालेला ऐकून मनस्वी आनंद झाला, आज मुंबईमध्ये पुरस्कार वितरण सोहळ्यात रघुराम राजन चव्हाण साहेबांच्या बद्दल काय बोलतात याची उत्सुकता लागली आहे.
सह्याद्री पर्वतातील महादेव डोंगर रांगेच्या दक्षिणेकडील टोकावर वसलेल्या देवराष्ट्र गावातून कसलाही वारसा नसलेला साहेबांचा सुरु झालेला प्रवास महाराष्ट्र काबीज करतो आणि भरतराष्ट्रात जाऊन आपला वेगळा ठसा उमटवतो ही गोष्ट खरंच अतिसामान्य आहे.
साहेब प्रतिनिधित्व करत होते त्या 257 कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचा मतदार असल्याचं भाग्य मला मिळालं याचा मला कायम अभिमान वाटतो.

खूप लिहण्या सारखे आहे तूर्तास एवढंच🙏🙏
Comments
Post a Comment