"साल्हेर ते श्रीलंका- शिवछत्रपतींचे स्वराज्य."
डॉ. निलेश पवार,
वनस्पती शास्त्र विभाग,
न्यू कॉलेज, कोल्हापूर.
9860282394
वनस्पती शास्त्र विभाग,
न्यू कॉलेज, कोल्हापूर.
9860282394
इतिहास कोणताही असो तो ससंदर्भ असेल तर कधीही पुसला जाऊ शकत नाही. आत्तापर्यंत आम्ही जो इतिहास वाचला तो बहुतांश पुराणकथा, रम्य किंवा भावनिक कथा आणि नाटकाच्या माध्यमातून, प्रथम ससंदर्भ इतिहास वाचण्याचा योग आला तो जयसिंगराव पवारांच्या संताजी घोरपडे यांच्यावरील पुस्तकातून. नंतर facebook च्या माध्यमातून बरेच नवीन मित्र झाले, त्याच्यातील एक म्हणजे डॉ. नीरज साळुंखे. त्यांची फेसबुक वरील कोणतीही पोस्ट असो, ती मी हमखास वाचतोच त्याचे महत्वाचे कारण म्हणजे प्रत्येक शब्द हा ससंदर्भ मांडलेला असतो.नुकतेच त्यांचे शिवाजी महाराजांवरील " छत्रपती शिवाजी महाराजांचे साम्राज्य" हे पुस्तक प्रकाशित झाले, ते वाचले आणि हा लेखन प्रपंच.
वनस्पतीशास्त्र विषय असल्याने गेली 20 वर्षे सह्याद्रीत फिरण्याचा योग आला, फिरत असताना वनस्पती बरोबरच इतिहासाच्या पाऊल खुणा जाणून घ्यायला आवडायच्या. पश्चिम घाटावर आधारित एका संशोधन प्रकल्पावर काम करण्याची संधी मिळाल्याने, उत्तरेकडील तापी नदी पासून दक्षिणेकडील कन्याकुमारी पर्यंत 5 वर्ष पश्चिम घाटात फिरलो आणि प्राप्त ज्ञानाच्या आधारे गेल्या वर्षी शिवजयंती ला मी महाराजांच्या वरती "शिवछत्रपती: राजा सह्याद्रीचा" हा छोटेखानी लेख लिहलेला. त्या लेखात स्वराज उभारण्यात महाराजांनी सह्याद्रीचा कसा उपयोग करून घेतला याचा उहापोह केलेला होता.
या शिवजयंतीला नीरज सरांचे " छत्रपती शिवाजी महाराजांचे साम्राज्य" हे पुस्तक आले आणि मला स्वराज्याच्या वाढीव भौगोलिक सीमेसंदर्भात कुतुहुल निर्माण झाले, पुस्तक हातात आल्याबरोबर एक दिवसात वाचून काढले. वाचल्यानंतर स्वराज्याचा विस्तार हा फक्त महाराष्ट्रातील सह्याद्री पुरता मर्यादित न राहता तो अगदी संपूर्ण पश्चिम घाटा पर्यंत होता हे समजले.
पश्चिम घाट म्हणजे जैवविविधतेच्या दृष्टीने संपन्न असणाऱ्या जगातील 8 अतिसंवेदनशील घनदाट जंगल क्षेत्रा पैकी एक. काही शास्त्रज्ञांच्या मते पश्चिम घाटामध्ये श्रीलंकेमधील काही जंगलाचा भाग समाविष्ट होतो, सरांच्या पुस्तकात प्रथमच इतिहासकार आणि शिवप्रेमींना अपरिचित असलेली शिवाजी महाराजांची श्रीलंकेतील जाफना बंदरावर धडक दिलेली मोहीम समकालीन पत्राच्या आधारे अधोरेखित केली आहे. सदर संशोधनाने महाराजांना आंतरराष्ट्रीय योद्धा असे अधिष्ठान प्राप्त करून दिले आहे. राज्याभिषेकानंतर दक्षिण दिग्विजया साठी निघालेल्या मोहीमचा मार्ग नव्याने मांडण्यात आला आहे, ज्या मध्ये महाराजांचा प्रवास हा पश्चिम घाटातील वेगवेगळ्या जंगल क्षेत्रातून झालेला पहावयास मिळतो. प्रामुख्याने याच्यात Evergreen, Semi evergreen, Moist Deciduous, Dry Decidious, Swamp आणि Shola फॉरेस्ट चा समावेश होतो. सदर मोहिमेतील मावळ्यांना जंगलातील कितीतरी नवीन वृक्षांची माहिती झाली असेल, अंशी आणि अगुंबे परिसरात वावर असणाऱ्या किंग कोब्रा सापाचे दर्शन झाले असेल, खरच या मोहिमेचा दांडेली, अंशी आणि एल्लापुर परिसरातील प्रवास थक्क करणारा असेल.
जगातील 8 अतिसंवेदनशील घनदाट जंगलांपैकी अजूनही 7 क्षेत्रे अशी आहेत की तिथे मनुष्य वस्ती नाही आणि राहिलेले एक क्षेत्र म्हणजे पश्चिम घाट जिथे 350 वर्षापुर्वी एक राजा राज्य करत होता, या गोष्टीचे महत्व जागतिक स्तरावर अनन्यसाधारण असेच आहे.
"Chatrapati Shivaji was the first king of one of the biodiversity hotspots in the world".
सरांच्या पुस्तकात सदर मोहीमीची मांडणी अचूक केली आहे याचे कारण म्हणजे त्यांचा इतिहासा एवढाच भूगोलाचा असणारा अभ्यास आणि कितीतरी समकालीन साधनांचे वाचन आणि योग्यठिकानी केलेले प्रकटन. पुस्तकातील नकाशे बघितले तर या अवघ्या साम्राज्याचा विस्तार लक्षात येतो, सुमारे 1600 km उत्तर दक्षिण हवाई अंतर आणि अंदाजे 1,20,000 sq km भूभाग असे हे विस्तीर्ण साम्राज्य, खरतर साडे 3 जिल्हे स्वराज्य होते असे म्हणणाऱ्या इतिहासकारांना ही सणसणीत चपराक आहे.
महाराजांच्या साम्राज्याची उंची बघितली तर श्रीलंकेतील जाफना किंवा सिंधुदुर्ग येतील झिरो Mean Sea Level ते साल्हेर किल्ला 1575 Mean Sea Level पर्यंत असलेली दिसते, जगाच्या इतिहासात असे वेगळेपण असणारे दुसरे साम्राज्य असेल असे वाटत नाही. या साम्राज्याच्या उंचीवरूनच मला साल्हेर ते श्रीलंका हे शीर्षक सुचले.
नीरज सरांचे पुस्तक एकदा वाचले,जसजसे अजून वाचत जाईन प्रत्येक वेळी नवीन माहिती मिळेल.

ससंदर्भ इतिहास वाचणाऱ्या खऱ्या शिवप्रेमीला हे पुस्तक नक्कीच आवडेल.
सरांनी असेच लिहीत रहावे आणि आम्हाला ते वाचून 4 शब्द लिहण्याची संधी द्यावी👏👏👏👏
शेवटी जाता जाता एक आफ्रिकन quote नमूद करतो
" Until the lion learns how to write every story will glorify the hunter".
आता इतिहास घडवणारे इतिहास लिहू लागले आहेत त्यामुळं असाच सत्य इतिहास बाहेर येत राहील.
👍👍👍👍👍

Comments
Post a Comment