Posts

"मला भावलेले भाऊराव" डॉ. निलेश पवार, न्यू कॉलेज, कोल्हापूर. दहावी ची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर रयत शिक्षण संस्थेच्या कॉलेज मध्ये प्रवेश घेण्याच भाग्य लाभलं आणि हळू हळू भाऊराव मनाला भावु लागले, 19 व्या शतकात ठराविक वर्ग आणि शहरा साठी मर्यादित असलेल्या शिक्षणाची गंगा वर्गविरहित वाडी वस्ती पर्यंत घेऊन जाण्याचे महान काम या आधुनिक शिक्षणाच्या भगिरथाने केले. अश्या या भगिरथाचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील वारणा खोऱ्यातील कुंभोज या गावी झाला. भाऊरावांचा बाणा हा लहानपणापासूनच वारणेच्या वाघा सारखा असायचा, कसलाही मुलाहिजा न बाळगता मनाला पटेल आणि योग्य वाटेल ते करणे, आपले परखड विचार कशाचीही पर्वा न करता मांडणे हे भाऊरावाचें जन्मजात गुण. भाऊराव कोल्हापूर ला शिक्षणासाठी असताना जैन बोर्डिंग मध्ये राहत, तिथल्या कर्मठ रूढींना विरोध करणे तसेच सोहळ न घालून रुढींना फाटा देणे , राजर्षी शाहू नी अस्पृश्यासाठी सुरु केलेल्या मिस क्लार्क हॉस्टेल च्या उदघाटनासाठी जाऊन परत आल्यावर अंघोळ न करता जेवायला येणे, या सर्वांचा परिपाक म्हणून शेवटी भाऊरावना हॉस्टेल सोडावे लागले. Thinking out of box असणाऱ्या...
"दूर दूरच दूरदर्शन, कस झालं हातचं काकन" डॉ. निलेश पवार, न्यू कॉलेज, कोल्हापूर सह्याद्रीच्या कुशीमधील कार्तिक स्वामी रांगेतील बाळोबाच्या डोंगराच्या पायथ्याला वसलेलं आमचं गाव, आमचा जन्म आणि गावात धोम धरणाचं पाणी 1980 च्या दरम्यान आलेलं. गाव सधन, पण करमणुकीसाठी कायमस्वरूपी रेडिओ सोडलं तर काय पण नाय. गावात पहिला tv म्हणजेच आपलं दूरदर्शन आलं ते 1985 च्या दरम्यान, तिथं पण पैसे देऊन बघायला गर्दी. रामायण बघायला तर उभं राहून बघावं लागायचं, कोणतरी मोठं माणूस मध्येच सगळ माहीत असल्याचा आव आणायचं जस काय रामायण लिहीत असताना ह्यो वाल्मिकींच्या शेजारी बसलेला. आम्हाला कायम एकच कौतुक, राम लक्ष्मण अंघोळ आणि बाकीचं विधी कधी करत्यात, बरीच जण राम दिसला की पाया पडायची, रामायण चालू असताना मध्येच लाईट गेली की मग काय प्रत्येक वेळी आमच्या शब्दकोशात भरती होईल असल्या शिव्या, टीव्हीत झिरमुळ्या आल्या की सगळ्यांच्या नजरा अँटेना वर कावळा बसलाय का बघायला. एखादा राष्ट्रीय नेता गेला की चारपाच दिवस टीव्ही बंद, नुसतं इंद्रधनुष्य टीव्ही त घुसल्या सारखे कलर बँड आणि कुर्र्रर्रर्र आवाज. Sorry for interruption स...
" एक रुपया चांदीचा, सारा देश गांधींचा?" डॉ. निलेश पवार, न्यू कॉलेज, कोल्हापूर गावात जिल्हा परिषदेच्या शाळेत प्राथमिक शिक्षण घेत असताना 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी ला ध्वजारोहणाच्या अगोदर प्रभात फेरीत अनेक घोषणापैकी आम्हाला गुरुजींनी सांगितलेली एक घोषणा म्हणजे ' एक रुपया चांदीचा सारा देश गांधींचा'. खरंच सारा देश गांधींचा होता?वयाची 40 वर्ष पूर्ण होत आली पण अजूनही हे समजलं नाही की खरच सारा देश गांधींचा होता किंवा नाही. पुस्तकातून गांधी आम्हाला शिकायला मिळाले ते म्हणजे आफ्रिकेत ट्रेनमधून खाली टाकलेले सामान, सविनय कायदेभंग, असहकार, सत्य, अहिंसा, दांडी सत्याग्रह, पुणे करार, चले जाव चळवळ या वेगवेगळ्या स्वरूपात, आणि बाहेर त्यांची वेशभूषा, चष्मा, काठी, टक्कल यावरून सर्वात जास्त कुचेस्टा सहन करत असलेला नेता. भारताची फाळणी, पाकिस्तानला 55 कोटींची आर्थिक मदत, फाशी वाचण्यासाठी भगतसिंग ना कसलेही सहकार्य केले नाही, यांच्यामुळं स्वातंत्र मिळायला उशीर अश्या अनेक गोष्टी बापूंच्या बद्दल बाहेरून ऐकायला मिळाल्या. या सर्वांचा परिणाम म्हणजे गांधींजींच्या प्रतिमेबद्दल मनात संभ्रम तयार झा...
"साल्हेर ते श्रीलंका- शिवछत्रपतींचे स्वराज्य." डॉ. निलेश पवार, वनस्पती शास्त्र विभाग, न्यू कॉलेज, कोल्हापूर. 9860282394 इतिहास कोणताही असो तो ससंदर्भ असेल तर कधीही पुसला जाऊ शकत नाही. आत्तापर्यंत आम्ही जो इतिहास वाचला तो बहुतांश पुराणकथा, रम्य किंवा भावनिक कथा आणि नाटकाच्या माध्यमातून, प्रथम ससंदर्भ इतिहास वाचण्याचा योग आला तो जयसिंगराव पवारांच्या संताजी घोरपडे यांच्यावरील पुस्तकातून. नंतर facebook च्या माध्यमातून बरेच नवीन मित्र झाले, त्याच्यातील एक म्हणजे डॉ. नीरज साळुंखे. त्यांची फेसबुक वरील कोणतीही पोस्ट असो, ती मी हमखास वाचतोच त्याचे महत्वाचे कारण म्हणजे प्रत्येक शब्द हा ससंदर्भ मांडलेला असतो.नुकतेच त्यांचे शिवाजी महाराजांवरील " छत्रपती शिवाजी महाराजांचे साम्राज्य" हे पुस्तक प्रकाशित झाले, ते वाचले आणि हा लेखन प्रपंच. वनस्पतीशास्त्र विषय असल्याने गेली 20 वर्षे सह्याद्रीत फिरण्याचा योग आला, फिरत असताना वनस्पती बरोबरच इतिहासाच्या पाऊल खुणा जाणून घ्यायला आवडायच्या. पश्चिम घाटावर आधारित एका संशोधन प्रकल्पावर काम करण्याची संधी मिळाल्याने, उत्तरेकडील तापी नदी प...
"यशवंत वाटचाल:देवराष्ट्र, महाराष्ट्र ते भरतराष्ट्र" डॉ. निलेश पवार, न्यू कॉलेज, कोल्हापूर. सातारा जिल्हा परिषदेच्या पिंपरी ता. कोरेगाव येथील प्राथमिक शाळेत शिक्षण घेत असताना यशवंतराव चव्हाण यांच्यावरील वक्तृत्व स्पर्धेत भाग घेण्याची संधी तत्कालीन शिक्षकांच्यामूळ लाभली, त्यावेळी संपूर्ण भाषनाचा मसुदा शिक्षकानी तयार करून दिलेला होता,मी फक्त समोर जाऊन बटन दाबले की टेप जसा चालू होतो तसं पाठ केलेलं संपूर्ण भाषण एकही शब्द न वगळता बोलायचो, घरच्यांना याच आप्रूप वाटायचं, घरात कोण पाहुणे आले किंवा पाहुण्यांच्या घरी यात्रेला जेवायला गेलो की वडील टेप चालू केल्यासारखे मला भाषण करायला सांगायचे. आमच्या घरात माझ्या आजोबांच्या फोटो शेजारी चव्हाण साहेबांचा फोटो होता, त्यामुळं लहान असताना मला ते आमच्या घरातलं कोणतरी आहे असं वाटायचं, नंतर घरातलं राजकीय वातावरण असेल किंवा राजकारणाची ओढ यामुळं चव्हाण साहेबांच्या विषयी वाचन वाढलं आणि साहेब समजत गेले. "धन्य मराठी माय माउली धन्य मराठी देश, उद्योगाची कमान चढते भिडे इथे आकाश, होय कोयना नव्या युगाची समृद्धीची आशा, नांगरली ती माळावरती सौभाग्...